ProZ.com वरील संज्ञावली साधनांचा सारांश
कुडोझ™, वरील लाखो भाषांतरित संज्ञा आणि वाक्प्रचार, वापरकर्त्यांच्या संज्ञावली आणि आणखी गोष्टींचा शोध घ्या.
KudoZ™ने व्यावसायिक अनुवादकांना आणि इतरांना ज्या संज्ञा अतिशय नवीन किंवा विशेष असल्यामुळे बहुतांशी शब्दावल्यांमध्ये किंवा शब्दकोशांमध्ये आढळत नाहीत, त्यांच्या अनुवादाची विनंती करण्यासाठी आणि अनुवाद सामायिक करण्यासाठी एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे. गुण देण्याच्या प्रणालीमुळे सहभागी अनुवादकांना आनंद मिळतो आणि त्यांच्या तज्ज्ञतेच्या क्षेत्रात त्यांची निर्देशिकेतील स्थितीसुद्धा सुधारते. ProZ.com ने
KudoZ™ ही अनुवादकांना आणि भाषाप्रेमींना एक मोफत सेवा म्हणून देऊ केली आहे. त्याचा वापर पूर्णपणे विनामूल्य आहे.
ग्लॉसपोस्ट हा इंटरनेटवरील शब्दावलींच्या दुव्यांचा शोधता येण्याजोगा डेटाबेस आहे. तो ProZ.com च्या आणि ब्राझिलियन अनुवादक आणि कॉन्फरन्स दुभाषी मारिया युजेनिया फॅरे यांनी तयार केलेल्या त्याच नावाच्या याहूग्रुपच्या सदस्यांनी संकलित केला आहे. डेटाबेसची देखभाल स्वयंसेवी मॉडरेटरच्या गटाद्वारे केली जाते, तथापि, कोणताही ProZ.com वापरकर्ता डेटाबेस शोधू शकतो, किंवा नवीन ग्लॉसरी यूआरएल सबमिट करू शकतो.