ProZ.com बद्दल मूलभूत बाबी


जगातील अनुवादकांच्या सर्वात मोठ्या समुदायाची सेवा करताना, ProZ.com अत्यावश्यक सेवा, संसाधने आणि अनुभवांचे सर्वसमावेशक नेटवर्क देते, जे त्याच्या सदस्यांचे जीवन सुधारते. येथे सर्वात मूलभूत गुणवैशिष्ट्यांची यादी आणि सारांश दिला आहे


कठीण संज्ञांचे अनुवाद करण्यासाठी मदत द्या आणि मिळवा

कुडोझ नेटवर्क अनुवादक आणि इतरांना एकमेकांना संज्ञा किंवा छोटे वाक्प्रचार यांची भाषांतरे किंवा स्पष्टीकरणे यामध्ये मदत करण्यासाठी फ्रेमवर्क पुरवते. आजपर्यंत अनुवादाचे 3,619,162 प्रश्न विचारले गेले आहेत. हे सर्व प्रश्न आणि त्यांना सुचवली गेलेली भाषांतरे यामुळे एक खूपच उपयुक्त शोधता येण्याजोगा साठा तयार झाला आहे.


भाषा व्यावसायिकांना कामावर ठेवा आणि नवीन क्लाएंटना भेटा

ProZ.com हा अनुवादकांकरिता नवीन क्लाएंटसाठीचा क्रमांक एक चा स्त्रोत आहे. अनुवाद आणि दुभाषाची कामे हे जॉब सिस्टिममार्फत पोस्ट केले जातात आणि स्वारस्य असलेले पक्ष त्यानंतर किंमती सादर करू शकतात. जॉब पोस्टिंग सिस्टिमच्या व्यतिरिक्त, फ्रीलान्स अनुवादक आणि दुभाष्यांची शोध घेता येण्याजोगी निर्देशिका सुद्धा आहे, जी भाषा व्यावसायिक शोधण्यासाठी वापरली जाऊ शकते


ProZ.com च्या कार्यक्रमांना उपस्थित राहा - संमेलने, प्रशिक्षणे आणि पाऊवाऊज्

संपूर्ण जगभरात ProZ.com कॉन्फरन्सेस, प्रशिक्षण सत्रे (ऑनलाईन आणि ऑफलाईन) आणि पाऊवाऊज् (जवळपास राहणाऱ्या ProZ.com वापरकर्त्यांच्या गटांची अनौपचारिक संमेलने) होत असतात. हे कार्यक्रम आपल्या कौशल्यांचा विस्तार करण्याचे, नवीन व्यावसायिकांना भेटण्याचे आणि मजा करण्याचे अत्यंत चांगले मार्ग आहेत!


आऊटसोर्सर्सबद्दल अभिप्राय ठेवा, इतरांद्वारे दिलेले अभिप्राय वाचा

ब्ल्यू बोर्ड हा भाषासंबंधित जॉबच्या आऊटसोर्सर्ससाठी सेवा पुरवठादारांच्या अभिप्रायांसह शोधता येण्याजोगा डेटाबेस आहे. ज्यांनी विशिष्ट आऊटसोर्सरबरोबर काम केले आहे अशा ProZ.com वापरकर्त्यांना दिलेल्या आऊटसोर्सरसह त्याच्या किंवा तिच्या “पुन्हा काम करण्याच्या शक्यतेशी” सुसंगत 1 to 5 संख्या तसेच एखादी थोडक्यात टिप्पणी प्रविष्ट करायला परवानगी असते. फाईलवर 15,000 आऊटसोर्सर्स असल्यामुळे नवीन क्लाएन्टकडून काम स्वीकारण्यापूर्वी ब्लू बोर्डचा सल्ला घेण्याची सवय चांगली आहे.


अनुवादातील समस्यांची इतर व्यावसायिकांबरोबर चर्चा करा

अनुवादक किंवा दुभाष्या असण्यामध्ये येणाऱ्या संबंधित समस्यांची चर्चा करा जसे की स्थानिकीकरण, सीएटी साधनांबाबत तांत्रिक मदत, प्रस्थापित होणे, उपशीर्षके,इ.कुठे सुरुवात करायची असा विचार पडला आहे?

मोफत खाते तयार करून » सुरुवात करा.
अगोदरच ProZ.com खाते आहे? लॉग-इन » करा


साईटवर दृष्टिक्षेप

ProZ.com वर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांकडे एक झटपट दृष्टिक्षेप
All of ProZ.com
  • All of ProZ.com
  • संज्ञा शोध
  • कामे
  • चर्चापीठे
  • Multiple search