कुडोझ™ ProZ.com वापरकर्त्यांना एकमेकांना आणि पाहुण्यांना कठीण संज्ञांचे अनुवाद करण्यामध्ये मोफत साहाय्य देऊ करण्याचा मार्ग पुरवते.
एखादी संज्ञा किंवा लहान वाक्प्रचार भाषांतरित करण्यासाठीच्या मदतीकरिता कुडोझ प्रश्न पोस्ट करा आणि संदर्भ, इच्छित लक्ष्यित भाषा, आणि इतर वैकल्पिक माहिती पुरवा. आपला प्रश्न पोस्ट केल्यानंतर, ProZ.com वापरकर्ते त्यानंतर स्पष्टीकरणे आणि कधीकधी संदर्भ यांच्यासहित अनुवाद सुचवतील.
पुरेसा प्रतिसाद आल्यानंतर, सर्वात उपयुक्त उत्तर त्यानंतर निवडले जाऊ शकते. ज्यांनी सादर केलेले उत्तर निवडले गेले, त्या व्यक्तीला नंतर काही कुडोझ गुण दिले जातील. कुडोझ गुण हा अनुवादक आणि दुभाषे यांना निर्देशिकामध्ये अनुक्रम देण्यामध्ये महत्त्वाचा निकष असतो.
प्रश्न आणि सुचवलेले अनुवाद साठविले जातात आणि त्यानंतर ते इतर कोणालाही उपलब्ध असतात.